Saturday, April 18, 2026
Homeमुंबईआता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी 'फर्स्ट एड किंवा सिक रूम'......

आता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ‘फर्स्ट एड किंवा सिक रूम’… -प्रत्त्येक शाळेत बंधनकारक- शालेय शिक्षण विभाग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात,तसेच शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी ‘फर्स्ट एड किंवा सिक रूम’ उपलब्ध करून द्यावी; असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा तास विद्यार्थी उपस्थित असतात.या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.अशावेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही.शिबिरामध्ये कृत्रिम श्वाशोच्छास, कृत्रिम वायू जीवन व इतर तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.शाळेनजीक उपलब्ध असलेल्या रुग्णालये,आरोग्य केंद्र,खासगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावावेत, त्यांच्याशी समन्वय ठेवावा.आपात्कालीन हाताळण्यासाठी परिस्थिती शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमावा.आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी.विद्यार्थ्यांकरिता शाळास्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे आयोजन करा.विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची व्यवस्था करावी; असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!