- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-आजच्या तरुणाईचे शिक्षणाकडे लक्ष कमी तर झटपट श्रीमंती कशी मिळवता येणार,याकडे सर्वात जास्त लक्ष असल्याचे चित्र आहे.झटपट श्रीमंतीच्या नादात अनेकजण वाम मार्गाकडे वळतांना दिसून येतात.मात्र,याला अनेकजण अपवादही आहेत.अनेक तरुणांना वाटतेय की,शिकून काय होणार? नोकरी तर मिळणारच नाही.त्यामुळे आपण आपले बघितलेले बरे.त्यामुळे इतर पर्यायी मार्ग शोधून गुन्हेगारीच्या खाईत जाऊन सर्वकाही गमावून बसतात.जोपर्यंत शरीर सुदृढ तो पर्यंत ठीक आहे; पण एकदा कां शरीराने साथ सोडली की,सर्वजण साथ सोडत असतात.अश्याच प्रकारे गुन्हेगारीच्या खाईत जाता-जाता दोन तरणेबान युवक चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती गवसले.चंद्रपूरचे पथक शनिवार १९ जुलै रोजी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना एका युवकाकडे देशी गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ब्रम्हपुरी तालुक्याच्या किन्ही गावातील संशयितांच्या घरी पंचासमक्ष छापा टाकला आणि झाडाझडती घेतली असता एक नग देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन नग काडतूस अवैधरित्या मिळून आले.प्रकरणी २६ वर्षीय गणेश उर्फ गोलू बक्षी सोनवणे रा.किन्ही, ता.ब्रम्हपुरी यास अधिक माहितीची विचारणा करण्यात आली. त्यानुसार त्याने मालडोंगरी येथील २९ वर्षीय अक्षय भजनदास शेंडे याने दिल्याचे सांगितले.त्यानुसार पंचनामा कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंद दाखल करून ब्रम्हपुरीच्या पोलिस ठाण्यात सुपूर्द केले.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

