- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-चोर-पोलिसां चा खेळ आपण अनेकदा बघितला आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या घरी एखादी चोरी झाल्यास पोलिसांकडे धाव घेतली जाते. मात्र,अज्ञात चोरटे चक्क पोलिसांच्याच घरांना टार्गेट करून चोऱ्या करू लागल्याचा प्रकार हल्ली कुरखेडा शहरात नुकताच उघडकीस आल्याने पोलिसांनाच पोलिसांच्या दारी जाण्याची पाळी आली आहे.
माहितीनुसार,अज्ञात चोरटे हे घरी कुणीही नसल्याची संधी साधून डल्ला मारत आहेत.कुरखेडा शहरातील कर्मचारी वर्गांची नगरी म्हणून ओळख असलेल्या श्रीरामनगर येथील प्रमीला चौधरी यांचे कुटुंबिय नातेवाईकांच्या लग्नसमारंभा करीता बाहेरगावी गेले होते.त्यातच घरा शेजारील कुटूंबीय हे सुध्दा बाहेरगावी गेले होते.बाहेर गावी जाताच अज्ञात चोरट्यांनी संधी साधून प्रमीला चौधरी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन लाख रुपयांच्यावर दागिन्यांवर डल्ला मारला.प्रमीला चौधरी यांचा मुलगा नव्यानेच पोलीस दलात रुजू झालेला आहे.पोलीसाच्या घरातच चोरट्यानी संधी साधल्याची चर्चा शहरात असून यापूर्वीही कुरखेडा येथील मूळ निवासी पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी यांच्या राणाप्रताप वार्डातील घरातसुद्धा काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी केली होती.त्यामुळे अज्ञात चोरटे चोर-पोलिसांचा खेळ करू लागलेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुरखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीच्या घटनांवर तात्काळ आळा घालावा,जेणेकरून अज्ञात चोरटे सर्वसामान्य नागरिकांच्या निवास्थनांना टार्गेट करून चोऱ्या करू नयेत.
- Advertisement -

