Saturday, August 8, 2026
Homeचंद्रपूरकापूस जिनींग कारखान्यात आग; सुदैवाने जिवीतहानी टळली..

कापूस जिनींग कारखान्यात आग; सुदैवाने जिवीतहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळील एमएस कापूस जिनींग कारखान्यात आज,रविवार २६ जानेवारीला सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे दोनशे गाठी जळून खाक झाल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे.सदरची आग ही शार्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.कारखान्यात कापसाच्या बोंड्यापासून कापूस वेगळा करण्याची यांत्रिक प्रक्रिया करून प्रक्रियेत कापसाच्या बोंड्यांमधून जिन्याचा कचरा काढून टाकला जातो आणि बियाण्यापासून कापसाचे तंतू वेगळे केले जातात.या जिनिंग मध्ये सीसीआय व प्रायव्हेट कापूस खरेदी सुरू होती.कापूस खरेदी केल्यानंतर कापसाच्या गाठी तयार करून पाठविल्या जातात.त्यामुळे आज रविवारी सकाळी गाठी तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान,अचानक कापसाच्या गाठींना आग लागली.सदर आग कामगारांच्या लक्षात येताच कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.लगेच गडचांदूर नगरपरिषद,अल्ट्राटेक सिमेंट,दालमिया सिमेंटच्या ३ अग्निशामक बोलविण्यात आले. अग्निशामक वाहनाच्या मदतीने आग विझविण्यात आली असून यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!