- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-ऐन उन्हाळ्यात कधी-कधी अवकाळी पावसाची एन्ट्री.त्यातच कडकत्या उन्हात जीवाची काहीली वाढून जीव कासावीस होऊन लागणारी तहान,शहरात कामगार,कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भटकंतीची निकड लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच देसाईगंज शहराच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पाणपोईचे उद्घाटन पार पडले.जनतेसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते करण्यात आले.
पूर्वी सर्वत्र जिकडे पाहावे तिकडे एखाद्याला मोफत पाणी पाजणे म्हणजे पुण्याचे काम मानले जायचे.मात्र,
सध्याच्या घडीला जनतेसाठी उभारण्यात येणारी पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.अशातच आमदार मसराम यांनी अनादिकाळापासून चालत आलेली पाणपोई जनतेच्या सेवेसाठी उभारल्याने त्यांची जनतेप्रती असलेली कळकळ लक्षात येते.
पाणपोई उद्घाटन प्रसंगी काँग्रेस कमिटीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी उपसभापती नितीन राऊत,सागर वाढई,काँग्रेस कमिटीचे देसाईगंज शहराध्यक्ष विजय पिल्लेवान,देसाईगंज युवक काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमर भर्रे,सावंगीचे
माजी सरपंच राजेंद्र बुल्ले,विलास बन्सोड,जावेद शेख,ज्ञानदेव पिलारे,नाकाडे,मोरू मोहुर्ले,आकाश ढोरे,स्वप्निल मिसार सह गौरव शिलार उपस्थित होते.
- Advertisement -

