- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच तरुणाई नशेच्या आहारी जाऊ लागल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलीस यंत्रणा गणेश विसर्जनात व्यस्त असतांनाच अंमली पदार्थांच्या तस्करीचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पाडला आहे.जिल्ह्यात ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुपित माहिती मिळताच सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २९८ ग्रॅम ब्राऊनशुगर व हेरॉईन जप्त करून मादक पदार्थाची तस्करी करण्याकरिता वापरलेले वाहन,रोख रक्कम व मोबाईल,असा एकूण ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन वय ४० वर्षे, रा.महात्मा फुले वॉर्ड,बाबुपेठ चंद्रपूर व २३ वर्षीय साहिल सतीश लांबदूरवार वय २३ वर्षे रा.भिवापूर वॉर्ड,चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे असून अंमली पदार्थ अधिनियमा अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार,काल शनिवारी अनंतचतुर्दशी दिनानिमित्त चंद्रपूर शहरात विविध मंडळांच्या वतीने गणेश विसर्जन सुरू होते.त्यामुळे शहरातील संपूर्ण पोलीस यंत्रणा व्यस्त होती.अश्यातच आरोपींनी याच संधीचा फायदा घेत मादक पदार्थ आणण्याचा बेत आखला.मात्र,सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पडोली चौकात सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या आधारे नेमके तेच वाहन काही वेळातच मार्गावर येताच एमएच ३४ बीआर ७७६५ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता,वाहनात तब्बल २९८ ग्रॅम ब्राऊनशुगर व हेरॉईन आढळून आली. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला.पुढील तपास पडोली पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

