- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-काही वर्षांपूर्वी अख्खी विहिरच चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने देशभरातील प्रशासन खळबळून जागे झाले होते.त्यावर काही चित्रपटही निघाले होते.अश्यातच आता नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅकवर लावलेले गट्टू छु मंतर होऊन बट्टू झाल्याने ‘ऐकावे ते नवलच..!’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.प्रकरणी याबाबत तक्रार चंद्रपूर महापालिकेला करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोहिनूर स्टेडियम आहे.या स्टेडियममध्ये नागरिकांना पायी चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता आणि त्यावर गट्ट बसवण्यात आले.हे स्टेडियम सध्या महापालिकेच्या अधिनस्त असून स्टेडियमचे सौंदर्गीकरण,देखभाल महापालिकाच करते.याच स्टेडियममधील वॉकिंग ट्रॅकचे गट्टू काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.आम आदमी पक्षाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार बघितला.तेव्हा त्यांनाही धक्का बसला.हे पेव्हर ब्लॉक चोरांनी लांबवले नाही,तर शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट मिळालेल्या अर्बन enviro कंपनीच्या लोकांनी लांबवले.इतकेच नाही तर हे गट्टू या कंपनीने आपल्या कार्यालयाच्या प्रांगणात सजवले.हा प्रकार उजेडात आल्यानंतर कंपनी या प्रकरणाची सारवासारव करीत आहे.कंपनीने म्हटले की,महाकाली यात्रेला आलेल्या भाविकांनी हे गट्टू काढून चुली तयार केल्या होत्या. त्यामुळे ते आम्ही उचलून आणले,अशी सफाई कंपनी देत आहे.तथापि,या प्रकरणाची तक्रार आम आदमी पक्षाने चंद्रपूर महानगरपालिकेला केली असून आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे आम आदमी पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

