- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.याला अनेक कारणे आहेत,परंतु वन विभागाचे अपुरे प्रशिक्षित मनुष्यबळ,अध्यावत संरक्षण साहित्य नाहीत.मिश्र तथा नैसर्गिक वनक्षेत्र वाढण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वन्यप्राणी गावाशेजारी येत आहेत.त्यामूळे शेतकरी,गरीब मजुरांचा नाहक बळी जात आहे.धाबा आणि विरुर वनपरिक्षेत्रात तेलंगनातून आलेल्या तिबेट नामक वाघाने धुमाकूळ घातला आहे.अनेक जनावरे, माणसांवर हल्ले करणे सुरू केले आहे.धाबा क्षेत्रात ग्रामस्थ आणि वनकर्मचारी संयुक्तपणे गस्त करीत आहेत; परंतु विरुर वनक्षेत्रात मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान,कोष्टयाला येथील एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याची घटना ताजी असतांनाच,परत कवितपेट क्षेत्रात एका महिलेचा वाघाने बळी घेतला. यामुळे या क्षेत्रातील जनता,शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.अशा घटना होत असतांना उपविभागीय वन अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः हजर राहून ही कारवाई पूर्ण करायला पाहीजे.मृतकाच्या नातेवाईकास तात्काळ मदत देतांना सुद्धा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नव्हता.जनतेच्या रोषाला केवळ वनपाल कसेबसे उत्तर देऊन प्रकरण हाताळीत होते.केवळ स्थानिक वन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन केवळ उंटावरून शेळ्या हाकलण्याचा प्रकार येथे सुरू आहे.येथील वनपरिक्षेत्र अधिकारी परिविक्षाधीन असल्याने नियमानुसार त्यांना नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून ठेवता येत नाही; असे सांगण्यात येते.त्यांचा अनुभव सुद्धा कमी असल्याने जनतेशी योग्य समन्वय ठेवण्यात अपयशी ठरले आहे.यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून,या वन अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी; प्रशिक्षित वन कर्मचारी तैनात करावे,ड्रोन कॅमेराने निगराणी ठेवावे; अशी मागणी केली जात आहे.
राजुरा उपविभागीय वनक्षेत्र अंतर्गत विरुर वनपरिक्षेत्रात दोन दिवसात वाघाने दोघांचा बळी घेतला.लोक दहशतीच्या छायेत आहेत परंतु उपविभागीय वनाधिकारी आणि विरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मात्र स्थानिक वन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन स्वतः उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करीत असल्याने,असा तोरा मिळविणाऱ्या या वनाधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

