Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरइसमाने  विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या....

इसमाने  विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

तळोधी बा.(चंद्रपूर) :- तळोधी बाळापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चारगाव (चक) येथील नीलकंठ गोपाळा ठाकरे वय ४८ वर्ष याने गावाजवळील शेत शिवारातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना काल, बुधवारी दिनांक-३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

वडील रात्री घरी परत न आल्याने सकाळी मुलाने तपास केला असता गावाशेजारी एका विहिरीजवळ दुपट्टा व वडीलाचे जोडे दिसल्याने विहिरीचा अंदाज घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह आढळला.याबाबत तात्काळ घटनेची माहिती तळोधी पोलिसात मुलाद्वारे दिली असता मर्ग दाखल करून, मृतदेह विहीरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.घटनास्थळी तळोधीचे ठाणेदार अजित सिंग देवरे व पी.एस.आय. लांबट यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास ए.एस.आय. ऊराडे हे करीत आहेत.मृतकला दारूचे व्यसन असल्याने त्याने ही आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!