Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मशाल काँग्रेस हातात धरणार काय? - मतदारांचे मन...

आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मशाल काँग्रेस हातात धरणार काय? – मतदारांचे मन आकृष्ट करण्यासाठी ताट्या,वाट्या,कटोऱ्यांचा वापर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
उपसंपादक/राजरतन मेश्राम
देसाईगंज(गडचिरोली):-सद्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरु असुन सर्वच राजकिय पक्ष जोमाने कामाला लागले असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्र मागासवर्गिय जनजातिच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या तिनही विधासभा क्षेत्रात आदिवासी समाजातिल धनदांडगे उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे.आपापल्या स्तरावर विविध पक्षांनी मोर्चेबांधणी केली असली तरी मीच खरा उमेदवार म्हणून मतदारांचे मन आक्रूष्ठ करण्यासाठी ताट्या, वाट्या,कटोरे व इतर साहित्य वाटप करून आपले प्राबल्य सिद्ध करतांना दिसत आहेत.असे असले तरी यात सर्वात मोठी डोकेदुखी महाविकास आघाडी साठी आरमोरी विधानसभा क्षेत्रात दिसुन येणार आहे. शिवसेना उबाठा व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली प्रबळ दावेदारी ठोकल्यामुळे शिवसेनेची मशाल हातात धरण्याची तयारी कॉंग्रेस करु शकेल काय? हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात देवरी -आमगांव,ब्रम्हपुरी,चिमुर,अहेरी,गडचिरोली व आरमोरी अशा ६ विधानसभा क्षेत्राचा समावेश असुन मविआचे घटक पक्ष असलेल्या देवरी विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसचे सहसराम कोरेटी हे विद्यमान आमदार आहेत.त्यामुळे हा क्षेत्र त्यांच्यासाठीच सोडण्याची तयारी मविआ ने केल्याचे समजते.ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मविआ च्या घटक पक्षांनी निर्विवाद पणे सोडावेच लागेल.चिमुर विधानसभा क्षेत्रात भाजपचे बंटी भांगडीया यांना आव्हान देण्यासाठी डॉ.सतिष वारजुरकर शिवाय दुसरा पर्याय नाही.ते कॉंग्रेसचे आहेत.अहेरी विधानसभेत विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याने त्यांना शह देण्यासाठी मविआचे शरद पवार यांनी आत्रामांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनाच थेट मैदानात उतरविल्याने बारामती लोकसभेच्या निवडणुकीत जे चित्र पहायला मिळाले; तेच चित्र अहेरीच्या माध्यमातुन पहावयास मिळणार आहे.गडचिरोली विधानसभेत डॉ. देवराव होळी हे भाजपचे विद्यमान आमदार असुन, त्याठिकाणी शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे मोठे प्राबल्य नसल्याने तो मतदारसंघ परंपरागत कॉंग्रेसचा राहिल्याने तो कॉंग्रेसलाच सोडावा लागेल.आरमोरी विधानसभेत भाजपचे कृष्णा गजबे हे दोन टर्म चे आमदार असुन तिसऱ्यांदा निवडुन येण्यासाठी त्यांनाही मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.आजपर्यंत या आरमोरी विधानसभा क्षेत्रात कोणताच आमदार तिसऱ्यांदा निवडुण आला नाही; हे विशेष.शिवसेनेचे हरीराम वरखडे हे आमदार होते; मात्र ते राष्ट्रवादीत गेले.शिवसेनेने डॉ.रामकृष्ण मडावी यांना संधी दिली. ते सलग दोन वेळा निवडुन आले.नंतर मात्र ते दोन ४ वेळा सतत पराभुत झाले.कॉंग्रेसचे आनंदराव गेडाम हे २ टर्म सलग आमदार राहिले.मात्र त्यानंतर २ टर्म नंतर त्यांनाही पराभव पत्करावा लागला.कृष्णा गजबे दोन टर्म सलग आमदार राहिले असुन,ते तिसऱ्यांदा आपले भाग्य आजमावित आहेत.मात्र खरी रस्सीखेच कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा यातच पहावयास मिळत असुन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठे यश प्राप्त झाल्याने व या क्षेत्रातील विद्यमान खासदार हे कॉंग्रेसचे असल्याने कॉंग्रेसचे मनोबल वाढल्याने आनंदराव गेडाम,डॉ.शिलु चिमुरकर,रामदास मसराम यांचेसह उपआयुक्त माधुरी मडावी,छगन सेडमाके यांचेसह तब्बल २२ उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळावी; यासाठी जमेल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसत आहेत.
सुरुवातीला आरोग्य शिबिरे व इतर कार्यक्रम घेत यात रामदास मसराम यांनी आघाडी घेतली.मात्र सर्वच उमेदवार एकत्र येत,काम करुन पक्ष संघटन मजबुत करावे; अशी सुचना वरिष्ठांकडुन होताच कोरची कुरखेडा जनसंवाद यात्रेत आनंदराव गेडाम,रामदास मसराम,माधुरी मडावी यांचेसह काही इच्छुक कॉंग्रेस उमेदवारांनी एकत्र येत जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला.पक्ष ज्याला तिकीट देईल,त्याचे काम करु अशी संयमी भुमिका घेत आनंदराव गेडाम यांनी आपल्या उमेदवारीचे आव्हान मात्र कायम ठेवले आहे.डॉ.शिलु चिमुरकर यांनी या सर्वांच्या पुढे जात एकट्याच्या बळावर जनसंवाद यात्रा काढली.पक्षाचे तालुकाअध्यक्ष सहयोग करत नाही,असा आक्रमक सवालही त्यांनी उपस्थित केला.आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन डॉ.शिलु चिमुरकर यांनी देसाईगंज च्या नगर परिषद सांस्क्रूतीक भवनात भव्यदिव्य महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन केले.जवळपास ३ हजार महिला कार्यक्रमात काहितरी मिळणार आहे; या आशेने कार्यक्रमात दाखल झाल्या.मात्र साध्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन नसल्याने महिंलामध्ये केस धरुन मारहान केल्याच्या घटना घडल्या.दुसरी विशेष बाब म्हणजे,अल्पोपहारही सर्व उपस्थित महिलांना मिळाला नाही.त्यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला.तिसरी महत्वाची बाब म्हणजे,महिलांचा सन्मान करण्यासाठी डॉ.शिलु चिमुरकर यांनी वाढदिवसाची थेट भेट म्हनुण कटोराचे वाटप सुरु केले.कटोराचे वाटप होतांना पाहुन उपस्थित नसलेल्या महिलाही कटोरा मिळविण्यासाठी कार्यक्रम स्थळी दाखल झाल्या.भिड वाढण्याचे चित्र पाहुन माझ्याकडे बचत गटांच्या माध्यमातुन उपस्थित झालेल्या महिलांची यादी प्राप्त झाली आहे; तुमचा कटोरा तुमच्या घरी पोहचता केला जाईल; असे आश्वासन देत डॉ.शिलु चिमुरकर यांनी कार्यक्रमातुन काढता पाय घेतला; एकटेपणे केलेली जनसंवाद यात्रा,कार्यक्रमात पिण्याच्या पाण्यावरुन महिलांनी केस धरुन केलेली मारहाण आणि महत्वाचे म्हणजे महिला सन्मान म्हणून महिलांना वाटप केलेला कटोरा तोही निवडकच लोकांना; यामुळे झालेली पक्षाची बदनामी यावर उमेदवारी सबंधाने डॉ.शिलु चिमुरकर यांचेवर असलेली टांगत्या तलवारीचे आव्हान संपुष्टात आणु शकते.असे असले तरी रामदास मसराम यांनी केलेला खर्च हा ही चर्चेचा विषय असला तरी आनंदराव गेडाम यांनी संयमी भुमिका घेत तिकिट मिळविण्यासाठी दिलेले आव्हान मनपाच्या उपआयुक्ताची प्रशासकिय सेवेतुन घेतलेली स्वेच्छा निव्रूत्ती,छगन शेडमाके यांचे आंदोलने,डॉ.मेघा सावसाकडे यांनी वडिल वामनराव सावसाकडे यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी द्यावी; यासाठी सुरु ठेवलेली झुंज यासह इतरही उमेदवारांचे सुरु असलेले प्रयत्न पाहता या आरमोरी विधानसभा क्षेत्रात तिन वेळा प्रतिनिधीत्व प्राप्त केलेल्या शिवसेनेची मशाल आपल्या हातात धरुन शिवसेना उबाठा लाच तिकिट मिळाल्यास मित्र पक्ष म्हणून प्रामाणिक सहकार्य करतील काय? अश्या गंभीर प्रश्नाने आरमोरी विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेस व सेनेत डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे.शिवसेना उबाठा ला तिकिट न मिळाल्यास विशाल पाटिल पैटर्न राबविण्याची तयारी ही शिवसेनेने सुरु केली असुन कॉंग्रेसचे २२ पैकी किती इच्छुक उमेदवार मैदान सोडतात यावरही निवडुकीचे चित्र अस्पष्ट असुन कोणत्या घडीला कोणता पक्ष काय निर्णय घेते याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!