Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने आज,बुधवार दिनांक-२ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने ‘स्वच्छता पंधरवडा’ अभियान राबवित सकाळी ७:३० वाजता आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना,जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील परिसराची स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लागवड करून ग्रामपंचायतीच्या समाज मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजेच्या सुमारास महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महात्म्यांच्या जीवन पटलावर प्रकाश टाकण्यात आला.प्रसंगी उत्कृष्ट स्वच्छता दूत पुरस्काचे वितरण करण्यात आले.उत्कृष्ट स्वच्छता दूत पुरस्काराचे मानकरी ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी केशव गायकवाड हे ठरले.ओला कचरा आणि सुखा करच्याची विल्हेवाट लावण्याकरीता गावातील ग्रामपंचायत कर थकबाकी नसलेल्या ग्रामस्थांना तसेच अंगांवाड्यांना कचरा कुंडी वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे अंगणवाडीतील चिमुकल्यांना  शैक्षणिक साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!