Sunday, October 25, 2026
Homeचंद्रपूरआमदार बंटी भांगडिया यांच्यासह आठ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आमदार बंटी भांगडिया यांच्यासह आठ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या ८ कार्यकर्त्यांवर मारहाण,शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.तर आमदार भांगडिया यांच्या तक्रारीवरून फिर्यादी साईनाथ बुटके यांच्यावरही शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.साईनाथ बुटके या काँग्रेस समर्थकाने त्याच्या व्हाट्सएप स्टेटसवर आमदार बंटी भांगडीया यांची आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केला होता.त्यामुळे संतापलेल्या बंटी भांगडीया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री साईनाथ बुटके यांना घरी जाऊन मारहाण केल्याचा आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.दरम्यान, आमदारांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या साईनाथ बुटके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता.यामुळे चिमूर येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!