Saturday, June 13, 2026
Homeमुंबईआता नॉनक्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख रुपये; ओबीसी समाजाला होणार मोठा फायदा...

आता नॉनक्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख रुपये; ओबीसी समाजाला होणार मोठा फायदा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे.काल,गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसींसाठी नॉनक्रिमिलेअरची मर्यादा आठ लाख रुपयांवरून वाढवून १५ लाख रुपये करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही बहुदा शेवटची बैठक काल गुरुवारी झाली.दसऱ्यानंतर पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे गुरुवारच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा होत्या. अपेक्षेप्रमाणे राज्य सरकारने सर्व क्षेत्रांतील हिताचे व्यापक निर्णय घेतले.ओबीसींच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवताना शेतीमधून मिळणारे उत्पन्न ग्राह्य धरू नये, अशीही राज्य सरकारची भूमिका आहे; असे स्पष्ट करत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.वार्षिक उत्पन्न वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.लोकांचे जीवनमान आणि वेतनस्तर उंचावल्यामुळे अनेक समाजातील लोकांना शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी असणारी आठ लाखांची मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. नॉनक्रिमिलेअरची मर्यादा वाढविल्याने त्याचा ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!