Wednesday, June 10, 2026
Homeमुंबईआता दोन वर्षाचा एम.एड.अभ्यासक्रम एक वर्षाचा..

आता दोन वर्षाचा एम.एड.अभ्यासक्रम एक वर्षाचा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पूर्वी बी.एड.झाल्यानंतर मास्टर डिग्रीसाठी
दोन वर्षांचा एम.एड.अभ्यासक्रम पूर्ण करावे लागत होते.अशातच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईने नुकताच एक वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.)अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.त्यापाठोपाठ आता देशात एक वर्षाचा मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड.) अभ्यासक्रमदेखील सुरू होणार आहे.आतापर्यंत एम.एड.अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता.२०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड.अभ्यासक्रम बंद होणार आहे.
याविषयी एनसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक पंकज अरोरा म्हणाले की,राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींच्या आधारे,यूजीसीने जून २०२४ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती.त्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार एक वर्षाचा एम.एड.अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.एक वर्षाचा बी.एड,दोन वर्षांचा पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा ४ वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी) अभ्यासक्रम अशा तिन्ही श्रेणींपैकी कोणत्याही एक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एक वर्षाच्या एम.एड.अभ्यासक्रम करण्यास पात्र राहणार आहे,अशी माहिती प्राध्यापक पंकज अरोरा यांनी दिली.
एक वर्षाच्या मास्टर्स प्रोग्रामसाठी २०२५ मध्ये शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले जातील.त्यानंतर हा अभ्यासक्रम २०२६-२७ या सत्रापासून सुरू होईल. एक वर्षाचा एम.एड.अभ्यासक्रम सुरू झाल्यावर २०२६ पासून दोन वर्षांच्या एम.एड. कार्यक्रमाचे प्रवेश घेतले जाणार नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!