उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात आज,बुधवार २९ जानेवारीला मौनी अमावस्येला अमृतस्नानाला करोडो भाविकांनी गर्दी केली होती.उत्तर प्रदेश मधील प्रयागराज महाकुंभामध्ये दुसरे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येनिमित्त गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.चेंगराचेंगरीमध्ये जखमींच्या मदतीला धावून आलेल्या चक्क रुग्णवाहिकेलाही आग लागल्याची बातमी समोर आली आहे.याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पहाटे १ च्या दरम्यान अमृतस्नान करण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली.त्यामुळे आजचे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे.यामध्ये अनेक भाविक जखमी झाले असून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आपात्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेलाही अचानक आग लागली.रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये ही आग लागली.सदरची घटना कॅमेरात कैद झाली असून आज घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महाकुंभ मेळाव्यासाठी सोडलेल्या विशेष गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
महाकुंभामध्ये चेंगराचेंगरी; अनेक भाविक जखमी तर १० जणांचा मृत्यू..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

