Wednesday, July 15, 2026
Homeभंडाराअवैध धंदेवाल्यांशी मधूर संबंध; दोन पोलिसांना ठाण्यातून केले 'गेट आऊट'..!

अवैध धंदेवाल्यांशी मधूर संबंध; दोन पोलिसांना ठाण्यातून केले ‘गेट आऊट’..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यातच नव्हे तर इतरही जिल्ह्यात अनेक पोलिस कर्मचारी अवैध धंदेवाल्यांशी मधूर संबंध ठेवतात.याला अपवाद जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच पोलीस असतील की ज्यांना पैश्याची हाव नाही.नाहीतर महिना भरला की,दारू वाल्यांची घरे हुडकून काढणे, तंबाखू विक्रेत्यांकडून पाकिटे,होलसेल दारू पुरवठा करणाऱ्यांकडून पाकिटे,अवैध सट्टा-पट्टी वाल्यांकडून पाकिटे,अवैध रेती वाल्यांकडून पाकिटे व इतर अशी अनेक पाकिटे अनेकांच्या घश्यात गेल्याशिवाय अवैध धंदे चालणार कशी? पोलिसांनी मनावर आणले तर सर्व अवैध धंदे बंद झाल्याशिवाय राहणार नाही.पण ‘चलती का नाम गाडी’ असे केले जाते.कित्येक अवैध धंदेवाल्यांकडे कुठल्या ना कुठल्या तरी साहेबांचा नंबर असतोच,हेही तितकेच खरे. “जो सापडला तो चोर अन्यथा मी त्यातला नाहीच,असे म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही बरं”. अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी पोलिस ठाण्यामध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी मधूर संबंध असल्याची माहिती समोर येताच भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यरत ठाण्यातून ‘गेट आऊट’ करीत जिल्हा पोलिस मुख्यालयात ‘कम इन’ करून तडकाफडकी बदली केली आहे.कमलेश शेंडे आणि उमेश मेश्राम अशी दोघांची नावे आहेत.मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या दोन बाजूंमध्ये विभागलेल्या करडी परिसरात अनेक अवैध धंदे फोफावली आहेत.अवैध रेती वाहतूक,जुगार अड्डे, दारूभट्ट्या व इतर धंदे जोमात सुरू असूनही त्यावर पोलिस विभागाचे काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन  पांघरून घालत आहेत.जुगारावर धाड टाकण्याआधी गोपनीय माहिती जुगारचालकांना देऊन सक्रीय केले जात होते.पोलिस कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी खास ओल्या मटन पार्ट्या रंगल्या होत्या.सदरचा प्रकार उघडकीस येताच पोलीस विभागाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.याची दखल स्वतः पोलीस अधीक्षकांनी घेतली आणि कमलेश शेंडे व उमेश मेश्राम यांची भंडारा जिल्हा पोलिस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!