Wednesday, July 15, 2026
Homeगडचिरोलीआता ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर निर्माण होणार रोजगाराच्या संधी.....

आता ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर निर्माण होणार रोजगाराच्या संधी.. – महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील तरुणांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आय.टी.आय.), गडचिरोली येथे ‘ट्रॅक्टर टेक’ हा ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी व महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री व ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील उच्चस्तरीय प्रशिक्षण मिळावे व त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार संधी निर्माण होण्यास तसेच कृषी व औद्योगिक क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्यास मदत व्हावी,हा यामागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.सह्याद्री अतिथिगृह येथे काल बुधवारी झालेल्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत हा सामंजस्य करार करण्यात आला.या वेळी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा,अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा,मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर,सचिव डॉ.श्रीकर परदेशी,आयुक्त लहूराज माळी,ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.रघुनाथ माशेलकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!