Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाकुरखेडाच्या आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश.. -आमदार मसरामांकडून मार्गाची प्रत्यक्ष...

कुरखेडाच्या आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश.. -आमदार मसरामांकडून मार्गाची प्रत्यक्ष पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या सती नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने मुख्य मार्ग बंद आहे.परिणामी, नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्गे प्रवास करावा लागत आहे.अश्यातच पर्यायी मार्गाचीही पुरती वाट लागून भले मोठे खाचखड्डे,दलदल व ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ असे झाल्याने मार्गावरून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्याबाबत रोष व्यक्त करत सदरचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत आहे.पावसाळ्यात वाहने घसरून अपघात होत आहेत. लहान मुले शाळेत जातांना पडतात.त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.सदर बाबीची गंभीर दखल घेत आज,बुधवार १० सप्टेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आंधळी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय हायवे विभाग,लघु पाटबंधारे विभाग यांचेसह पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना तात्काळ मार्गावर उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले.लगेच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली असता आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारास सांगितले की, “नागरिकांचा रोजचा प्रवास या मार्गावरून होत आहे. रुग्णवाहिका,शालेय विद्यार्थी,वाहतूक,शेतकरी,व्यापारी वर्ग यांचेसह सर्वसामान्य जनतेसाठी हा मार्ग सुकर आणि सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे; यासाठी दोन दिवसांच्या आत या  मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश दिले.प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात-लवकर मार्ग सुकर करण्यात येणार असल्याचे आमदार मसराम यांना सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!