- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-म्हणतात ना “गव्हासकट सोंड्याची पिसाई” अश्याच प्रकारची म्हण एका प्रकरणात लागू होऊन उघडकीस आली आहे.मामा हा भाषाचे चांग भलं करायला गेला अन् स्वतःच अडकून बसला.भाषाला मुलगी पसंत आली खरी,पण ती होती अल्पवयीन. अल्पवयीन असल्याने पोक्सो कायदा तर लागणारच, मात्र आता फुस लावून पळवून नेल्याचीही सजा मामा आणि भाषा अश्या दोघांनाही भोगावी लागणार आहे. सदरची घटना नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात उघडकीस आली आहे.अतुल उद्धव गायकवाड वय २८ वर्षे,रा.वासाळा मेंढा,ता.नागभीड जि.चंद्रपूर व भाषा समीर ईश्वर बोरकर वय २४ वर्षे,रा.पिपर्डा(चिमूर)अशी आरोपींची नावे असून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदर प्रकरण असे की,अल्पवयीन मुलीचे वडील यांनी नेहमी नजरेसमोर असणारी मुलगी घरी दिसत नसल्याने कुणीतरी आपल्या मुलीला फुस लावून पळवून नेले असावे,अशी शंका मनात बाळगून नागभीड पोलिस ठाण्यात मागील महिन्याच्या ३० ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली.त्यानुसार नागभीड पोलिसांनी प्रकरण संवेदनशील असल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गावात चौकशी करून कुणी फरार आहे काय? याची सर्वप्रथम चौकशी सुरू केली.त्यानुसार त्याच गावातील एक युवक घटनेपासून फरार असल्याची माहिती समोर आली.त्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाचे मोबाईल क्रमांक मिळवित कॉल डिटेल्स व वायरलेस रेकॉर्ड काढून संपर्क साधला असता अल्पवयीन मुलगी ही आरोपी अतुल गायकवाड आणि त्याचा भाषा समीर बोरकर याच्यासोबत असल्याची खात्री झाली.त्यानंतर पोलिसांनी आरोपी व अल्पवयीन मुलीशी व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला असता आम्ही विष प्राशन करून आत्महत्या करू,अशी धमकी दिली.त्यांनी पोलिसांना विषाची बाटलीही दाखविली.दरम्यान,पोलिसांनी आरोपी समीरच्या मोबाईलचे चालू लोकेशन मिळविले असता ते सातारा जिल्ह्यातील फलटण येथे असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर फलटण (ग्रामीण) पोलिसांना माहिती देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे आवाहन केले.फलटण पोलिसांनी काही वेळातच मुलगी व आरोपीला साताऱ्याच्या उपाल्वे येथून ताब्यात घेतले. फलटण पोलिसांनी अल्पवयीन मुलगी व आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर नागभीड पोलिसांची एक चमू फलटण येथे गेली.आरोपींना अटक करून नागभीड येथे आणले व मुलीस पालकांच्या स्वाधीन केले.सदरची कारवाई नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय दिलीप पोटभरे, विनोद गायकवाड,जय रोहणकर,आरती लुटे यांनी केली.
- Advertisement -

