Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरअन् सरपंचाला कोंडले सदस्याने…..-कुलूप लावून सदस्य झाला फरार….

अन् सरपंचाला कोंडले सदस्याने…..-कुलूप लावून सदस्य झाला फरार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चिमूर(चंद्रपूर) :- चिमूर पासूनआठ किलोमिटर  अंतरावरील भिसी-चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील येरखेडा गावातील सरपंच संजय गेडाम व ग्रामपंचायत ऑपेरेटर मितेश डांगे हे काल शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असतांना येरखेडा ग्रामपंचायतचे सदस्य सुधाकर नन्नावरे तेथे आले.त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दाराला कुलूप लावून सरपंच व ग्रामपंचायत ऑपरेटरला आत कोंडले.माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांचे सुद्धा गावा जवळच हॉटेल असून ते ब्लिचिंग पावडर मागायला येरखेडा ग्रामपंचायतला गेले असता ग्रामपंचायतला बाहेरून कुलूप लावलेला अन् बाहेर ग्रामपंचायत चपरासी बसलेले होते.याबाबत विलास डांगे यांनी सविस्तर माहिती घेतली असता सरपंचांना आतमध्ये कोंडून ठेवले असल्याची माहिती मिळताच त्यांनी तसेच गावातील काही नागरिकांनी भिसी पोलिस स्टेशनला फोनकरून घटनेची माहिती दिली. सदर घटनेची माहिती भिसी पोलिसांना कळताच भिसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन जंगम येरखेडा ग्रामपंचायत कार्यालयात आले व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांच्या समोर पहारीने कुलूप तोडून ग्रामपंचायत सरपंच व ऑपरेटरला बाहेर काढले.सरपंच गेडाम यांच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नन्नावरे यांच्या विरोधात भिसी पोलिसात भादंविचे कलम ३४२,१८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!