Friday, August 28, 2026
Homeचंद्रपूरअन् घरातच मांडला बिबट्याने ठिय्या..!- बिबट्याला पकडण्यास शुटरच्या नाकीनऊ....

अन् घरातच मांडला बिबट्याने ठिय्या..!- बिबट्याला पकडण्यास शुटरच्या नाकीनऊ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर(सिंदेवाही) :- सिंदेवाही उपवन परिक्षेत्रातील मुरमाडी (कोठा) गावातील अंबादास चिरकुटा श्रीरामे यांच्या घरात बिबट्या शिरल्याचे ग्रामस्थांना दिसले. सुदैवाने अंबादास यांच्या भावाची पत्नी घराच्या समोरच्या खोलीत झोपली होती. बिबट्या घरात शिरला मात्र अंबादासच्या भावाची पत्नी झोपलेल्या खोलीत बिबट्या पोहोचू शकला नाही,म्हणून मोठी दुर्घटना टळली.

बिबट्या घरात शिरला तोपर्यंत घरातील सर्व लोक मिरची तोडण्यासाठी गावाबाहेर गेले होते. घर रिकामे असल्याने अंबादासच्या भावाची पत्नी रसिका त्या घराच्या समोरच्या खोलीत झोपली होती. अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान बिबट्या घरात शिरल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. त्याआधारे सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल साळकर,क्षेत्र सहायक दीपक हटवार,उसेंडी यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.यावेळी सिंदेवाही पोलिसही घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत होते.घराच्या पाठीमागे शेत असल्याने हा बिबट्या त्या बाजूने आला असून घराचा मागील दरवाजा पूर्णपणे तुटल आहे. त्यामुळे याच दरवाजातून घरात प्रवेश केला असावा,असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ताडोबा येथून एक पथक (शूटर) पाचारण केले होते.बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी टीमने प्रथम घराच्या वरच्या भागावरून नेम घालण्याचा प्रयत्न केला.मात्र खोलीतील अंधार आणि नागरिकांची गर्दी यामुळे बिबट्यावर नेम घालणे शक्य झाले नाही.बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी शूटरच्या नाकीनऊ आले होते.मात्र काही वेळाने पथकाला यश मिळाले आणि बिबट पकडला गेला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!