Thursday, August 27, 2026
Homeमुंबईअधिकारी बनून ३२ लाख लुटले; पोलिसांनी चक्रे फिरवताच जाळ्यात अडकले...

अधिकारी बनून ३२ लाख लुटले; पोलिसांनी चक्रे फिरवताच जाळ्यात अडकले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- ईडीचे अधिकारी बनून झवेरी बुलीयन बाजारातील व्यावसायिकाकडील सुमारे चार कोटींच्या ऐवजाची लुट करण्यात आल्याची घटनेनंतर आता सेल्स टॅक्स अधिकारी बनून दोघांनी एका व्यक्तीजवळील ३२ लाखांची रोख रक्कम लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

अवघ्या काही तांसात लोकम्यान टिळक मार्ग पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत संजयसिंग करचोली (३३) आणि रजिया अजीज शेख (३६) या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.दोघेही सुरक्षारक्षक असल्याचे तपासात समोर आले आहे.शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जठाराम हे एका अंगाडियाकडून व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन पायी आपल्या कार्यालयात जात होते. येथील आदर्श हॉटेलजवळ एका महिला आणि एका पुरुषाने त्यांना अडवले. त्यांनी सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून जठाराम यांच्याजवळील ३२ लाख रुपयांची रोख रक्कम आणि त्यांच्याजवळील मोबाईल फोन ताब्यात घेत तेथून काढता पाय घेतला. घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या जठाराम यांनी कार्यालयात येत मालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. 

लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्ह्याची गांभिर्याने दखल घेत दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला.पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची माहिती मिळविली. त्याआधारे मंगलदास मार्केट परिसरातून आरोपी संजयसिंग याला ताब्यात घेतले.सुरक्षा रक्षक सुपरवायझर असलेल्या संजयसिंग याने त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या रजिया हिच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे चौकशीत समोर आल्याने पोलिसांनी तिलाही ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!