Friday, August 28, 2026
Homeदेसाईगंजपत्रकारास शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल….कोंढाळा येथील प्रकरण…

पत्रकारास शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल….कोंढाळा येथील प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील व इतर गौण खनिजांच्या शासनाच्या संपत्तीला चुना लावणाऱ्या व अवैधरीत्या तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘उद्रेक न्युज’ पोर्टल चे संपादक तथा ‘विदर्भ की दहाड’ चे प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी वारंवार अवैध तस्करी विरोधात शासनाच्या चोरी होणाऱ्या खनिज संपत्ती विषयी आळा घातला जावा; याकरिता बातम्यांच्या माध्यमातून आपली छाप पाडली.अशातच अवैध रेती उपसा बाबत बातम्या प्रसारित केल्याने गावातील काही गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तिंद्वारे ‘रेतीच्या बातम्या कशाला प्रकाशित करतो’ म्हणून शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या दिल्याने अखेर देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.
कोंढाळा वैनगंगा नदी घाटातून बऱ्याच महिन्यांपासून शासनाच्या खनिज संपत्तीची अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात आहे.शासनाच्या खनिज संपत्तीच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी बातम्या प्रसारित केल्याने कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील मेंढा घाट, सिंदराई घाट व नव्याने सुरू करण्यात आलेल्या घाटांवर महसूल विभाग खळबळून जागे होऊन अवैधरीत्या रेती तस्करीवर चाप बसविण्याकरीता खड्डे मारण्यात आले.मात्र हल्ली पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणावर शासनाच्या खनिज संपत्ती असलेल्या रेतीची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याने ‘उद्रेक न्युज’ पोर्टल चे संपादक तथा ‘विदर्भ की दहाड’ चे प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी बातम्या प्रसारित करून सदर प्रकरण उजेडात आणण्याचा प्रयत्न केला असता,कोंढाळा गावातील अक्षय राऊत (२६),संतोष धोटे(२९) व भास्कर धोटे(३६)यांनी धमकीवजा बोलणी करून शिवीगाळ केली. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ गणल्या जाणाऱ्या पत्रकारास दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.अन्यथा गुंड प्रवृत्तींच्या मनोविकृतांची दादागिरी आणखी वाढतच जाणार असल्याने अशांवर आवर घालणे गजेचे असल्याने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ५०६ अंतर्गत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!