Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीआज दुपारी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता होणार जमा - काही अडचण आल्यास...

आज दुपारी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता होणार जमा – काही अडचण आल्यास असे करा चेक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता आज २७ फेब्रुवारी दिला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १३ व्या हप्त्या जारी करण्यात येईल.ते कर्नाटकातील बेळगावातून दुपारी लोकार्पण करणार आहेत.सुमारे ८ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा आज लाभ दिला जाईल.दुपारी ३ वाजता हप्ता जारी केला जाईल.या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी २-२ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये वर्ग करण्यात येतात.योजनेच्या नोंदणीमध्ये कोणतीही अडचण येत असेल, किंवा तुमच्या हप्त्याशी संबंधित काही समस्या असतील व इतर काही प्रश्न असतील,तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मानच्या अधिकृत वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरमधील हेल्प डेस्कवर जावे लागणार आहे.हेल्प डेस्कवर क्लिक केल्यानंतर, येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका. Get Details वर क्लिक केल्यावर एक क्वेरी फॉर्म दिसेल.येथे ड्रॉप डाउनमध्ये खाते क्रमांक,पेमेंट,आधार आणि इतर समस्यांशी संबंधित पर्याय दिले आहेत.तुमच्या समस्येनुसार ते निवडा आणि खाली त्याचे वर्णन लिहा आणि सबमिट करा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!