- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-स्वतःच्या दुचाकीने परगावी लग्न समारंभासाठी जात असतांना वाटेतच अज्ञात पिकअप वाहनाने धडक दिल्याने धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज,मंगळवारी १८ फेब्रुवारीला सकाळी साडेसहाच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे घडली.सदरचे पती-पत्नी हे नागपूर शहरातील नवीन पारडी येथील असून अपघातात रोशन महावीर साहू वय २८ वर्षे व चांदणी रोशन साहू वय २३ वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की,पती-पत्नी हे दोघेही आज मंगळवारी सकाळच्या सुमारास दुचाकी क्रमांक -एमएच ४९ बीयु ५८६४ ने नागपूरहून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील तरोडी बोडा येथे लग्न समारंभासाठी जात होते.जात असतांना वाटेतच
भंडारा जिल्ह्याच्या चिखली फाट्याजवळ अज्ञात पिकप वाहनाने त्यांच्या दुचाकी वाहनास धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की,दुचाकीस्वार पती-पत्नी शंभर फूट अंतरापर्यंत फरफकटत गेले असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिंनी दिली.भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच जवाहर नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भिमाजी पाटील,पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड,पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर हाके,महेश कडव घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करीत अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
- Advertisement -

