Saturday, September 5, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची धडक; दुचाकी चालक तरुणाचा घटनास्थळावरच मृत्यू...

अज्ञात वाहनाची धडक; दुचाकी चालक तरुणाचा घटनास्थळावरच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर शहरात मजुरी करणाऱ्या व दुचाकीने स्वगावी जात असतांना वाटेतच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना काल,शुक्रवारी ३१ जानेवारीच्या दुपारी देवलापार,ता. रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील गुप्तगंगा शिवारात घडली.राहुल गोविंदसिंग ठाकूर वय ३० वर्षे,रा.जबलपूर,मध्यप्रदेश असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 राहुल हा नागपूर शहरात मजुरी करायचा.एमपी-२०/झेडएल-३१५६ क्रमांकाच्या दुचाकीने एकटाच नागपूरहून जबलपूरला जात असतांना वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या वाहनाला गुप्तगंगा शिवारात जोरात धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,अपघातात त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली.घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.घटने प्रकरणी देवलापार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!