Tuesday, September 22, 2026
Homeबीडअखेर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल..

अखेर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

बीड :-जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.वाल्मीक कराड सोडून इतर सात आरोपींवर मोकका(मोक्का) लावण्यात आला होता.प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे उशिरा का होईना अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मकोका लावल्यानंतर सीआयडी कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.सरपंच संतोष देशमुख्य यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करीत हा मकोका लावण्यात आला आहे.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांचीही वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी होती.त्यानुसार आज मंगळवारी वाल्मीक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद सुरू होता.त्यानंतर आता त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे.तसेच वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!