Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरअखेर वारंट नंतर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आयोगासमोर होणार हजर...- कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही..

अखेर वारंट नंतर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आयोगासमोर होणार हजर…- कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.मग तो संत्री असो,मंत्री असो की कितीही पैसेवाला असो; सर्वांसाठी कायद्या सर्वसमान आहे.चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना वाटले की राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिले तरी काहीही होणार नाही.मात्र म्हणतात ना कायद्याचा दणका ‘लय भारी’ असतो.

राजुरा तालुक्यातील कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनीवरील अतीक्रमणाच्या प्रकरणावर अटक वारंट जारी झाल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा १ मार्च रोजी अनुसुचित जमाती आयोगापुढे हजर होणार आहेत.गेल्या आठवड्यात,माणिकगड सिमेंट कंपनीच्या आदिवासींच्या जमिनीवरील कथित अतिक्रमण आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या परवानगीच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिलेल्या जिल्हा दंडाधिकारी गौडा यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

या वॉरंटनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगाला १ मार्च रोजी हजर विनंती केली.ती आयोगाने मान्य केली आहे.आयोगाने एक लेखी आदेश पत्र जिल्हाधिकारी गौडा यांना दिले.सकाळी १० वाजता नवी दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये थेट आयोगाचे सदस्य अनंता नायक यांच्यासमोर उपस्थित राहून त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले.कुसुंबी गावातील वादग्रस्त प्रकरणातील कागदपत्रे.या हजेरीदरम्यान याचिकाकर्ते दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनाही आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!