Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरअखेर 'त्या' किराणा दुकानदार महिलेचा मारेकरी निघाला १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा..

अखेर ‘त्या’ किराणा दुकानदार महिलेचा मारेकरी निघाला १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात व राजुरा शहरात १५ जून ला एकाच दिवशी दोघांच्या हत्या करण्यात आल्या होत्या.दारूच्या आहारी गेलेल्या व सततचे भांडण करून कीटकीट लावणाऱ्या पतीचा रागाच्या भरात पत्नीने रुमालाने गळा आवळून खून केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा (नवीन)येथे घडली होती.तर राजुरा शहरातील रमाबाईनगरात अज्ञाताने ५३ वर्षीय घरीच किराणा दुकान चालविणाऱ्या कविता रायपूरे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने प्रहार करीत हत्या केली होती. मात्र,सदरची हत्या करणारा कोण? याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू होता.अश्यातच तब्बल पाच दिवसांनी हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आणि तपासातून धक्कादायक बाब उघडकीस आली.चक्क उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून महिलेचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.विशेष म्हणजे,खून करणारा आरोपी हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असून तो पीडितेच्या शेजारील परिसरात राहतो.घटनेच्या दिवशी कविता रायपूरे घरी एकट्याच असतांना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला.त्यावेळी त्यांचा मुलगा,जो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो,ड्युटीवर गेला होता.सकाळी त्यांची विवाहित मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.पोलिस विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करत विविध बाबींवर भर दिला.त्यानुसार घटनेपूर्वीच्या बाबींवर भर देताच अल्पवयीन आरोपीचा शोध लागून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली.तपासादरम्यान पोलिसांना मयत महिलेच्या घराजवळ राहणारा एक तरुण अचानक बाहेर गावी गेल्याची माहिती मिळाली. यावर संशय घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.मयत कविता रायपूरे यांच्या घरीच लहान किराणा दुकान होते.आरोपीकडून सुमारे एक हजार रुपयांची उधारी बाकी होती.त्यामुळे त्यांनी पूर्वीची रक्कम न भरल्यास सिगरेट देण्यास नकार दिला.याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी अल्पवयीन तरुणाने पहाटेच्या सुमारास कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करत खून केला.विशेष म्हणजे,हा खून अचानक रागात न होता,आरोपीने अगदी शांतपणे,आधीच नियोजन करून केला होता.अल्पवयीन आरोपीने खून करण्याआधी इंटरनेटवरून गुन्हा कसा करावा,याची माहिती शोधली होती.विशेष म्हणजे,आपण अल्पवयीन असल्यामुळे फारशी कठोर शिक्षा होणार नाही,याचीही माहिती त्याने ऑनलाइन मिळवली होती.पळून जाण्यासाठी त्याने हुबळीला जाण्याचा बेत आखला होता आणि तिकिटही आधीच काढून ठेवली होती.गुन्हा करण्याआधी आपल्या मोबाईलमधील ब्राऊझिंग हिस्ट्रीही डिलीट केली होती.त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने त्याने खून केला आणि हुबळीला निघून गेला.पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!