Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअखेर खासदार धानोरकर यांचे भाऊ व इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल...- अधिकाऱ्यांना...

अखेर खासदार धानोरकर यांचे भाऊ व इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल…- अधिकाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्याची मुजोरी त्यांच्या चांगलीच अंगलट आली.प्रवीण काकडे यांच्यासह अन्य नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल,बुधवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे आघाडीवर होते.या प्रकाराची तक्रार KPCL कंपनीतर्फे भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली.त्यावरून पोलिसांनी प्रवीण काकडे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला या घटनेमुळे मोठा धक्का पोहोचला.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे.या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत.या प्रश्नांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी काल गेल्या होत्या.त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते.अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना कानाखाली लगावली.अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणे सुरू केले.यासगळ्या प्रकारामुळे सर्वत्र उधाण आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!