- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-विधानसभा नि वडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे.येत्या २० नोव्हेंबरला मतदान केले जाणार असून हल्ली ‘जोरो- शोरोसे’ प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे.काहींनी धनशक्तीचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.रामदास मसराम यांच्यासह आरमोरी विधानसभा मतदासंघात सात उमेदवार यामध्ये कृष्णा गजबे,आनंदराव गेडाम,शिलू गंटावार,मोहनदास पुराम,चेतन काटेंगे,अनिल केरामी व खेमराज नेवारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे बाजी मारणार कोण? हे अद्याप सांगता येणार नाही.
निवडणुकीपूर्वी आरमोरी विधानसभा क्षेत्रात ज्यांनी ख्यातीच नाही तर सर्वत्र विविध उपक्रम राबवून लोकसेवक म्हणून नाव लौकीक केले व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेतली.अनेकांना आपले केले.कुठलीही सत्ता व पद नसतांना लोकसेवेचा वसा जपला,असे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना जनतेची पसंती मिळणार असल्याचे मत छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांनी व्यक्त केले.
सागर वाढई पुढे म्हणाले की,मला आजही तो एक प्रसंग आठवतो की,एक ७५ वर्षीय आजी मोफत शिबिराचे लाभ प्रसंगी शिबिरा दरम्यान आली.रामदास मसराम यांच्याशी चर्चा करीत असतांना भाऊक होऊन तिला अश्रू अनावर झाले आणि असेच कार्य करीत रहा,भगवंत तुम्हाला मोठे करील,असे म्हणीत आजीने हृदयातून भावना व्यक्त करीत मसराम यांना आशीर्वाद दिला होता.यातूनच मसराम यांची जनतेप्रती असलेली कळकळ लक्षात येते.कित्तेक महिला म्हणाल्या की,आम्हाला लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये नाही मिळाले तरी चालतील; पण मसराम यांना निवडून आणू,पुढील वाटचालीस महिलांनी मसराम यांना शुभेच्छा दिल्या.प्रत्येक भगिनीशी आपुलकीने संवाद साधत त्यांना त्यांचा भाऊ म्हणून प्रत्येक अडचणीत उभा राहण्याचे आश्वासन प्रचार रॅली प्रसंगी रामदास मसराम यांनी दिले.प्रचारात एक आजी म्हणाल्या, रामदास मसराम हे समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालतात.कुठल्याही समाजाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी ते प्रत्येक ठिकाणी हजेरी लावतात. नागरिकांमध्ये मिसळण्याची त्यांची वृत्तीच त्यांना विजयाच्या मार्गावर घेऊन जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- Advertisement -

