- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर खंदे समर्थक महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांचे कार्य बघता वरिष्ठांकडून कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या आदेशाने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हासह प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मनोज ढोरे काँग्रेस पक्षातील सक्रिय नेता म्हणून त्यांची ओळख आहे.ऐकून घेण्याची क्षमता, सृजनशीलता,शांत स्वभाव,मोकळेपणा,दिल खुलास गप्पा-गोष्टी,आपलेसे करून घेणे व इतर गुण अंगी असलेले मनोज ढोरे नेहमी सामाजिक कार्य करतांना दिसून येतात.गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करणे, बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे,वाढदिवस दिनी रुग्णांना फळे वाटप,गरजूंना आर्थिक मदत, नागरिकांच्या समस्या सोडविणे,आंदोलन,निवेदने देऊन मागण्यांची पूर्तता करणे व इतर अशी अनेक कार्ये करून महत्वाची भूमिका त्यांच्याकडून बजावली जात आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी नसतांना युवकांचे प्रश्न मार्गी लावत जिल्हा परिषद क्षेत्राच्या कुरुड गावामध्ये विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज वाचनालयाची इमारत मंजूर करून आणीत इमारत बांधकाम उभारण्यात आले आहे.गावातील शेकडो विद्यार्थ्यांना वाचनालय इमारतीचा उपयोग होणार असल्याने गावातील युवक-युवतींनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांची निकड लक्षात घेता कलवट बांधकाम करून एकप्रकारे शेतकरी बांधवांना दिलासा देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.युवकांचे विविध उपक्रम तसेच जनतेच्या विविध समस्यांची दखल मार्गी लावण्याचा त्यांचा मानस असल्याचे दिसून येत आहे.कित्येकदा सार्वजनिक उपक्रमे राबवून सर्वसामान्य नागरिकांसह पक्षातील वरिष्ठ,सार्वजनिक मंडळे व गोर-गरीब लोकांची मने ढोरे यांनी जिंकली आहेत.त्यामुळे येत्या २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हासह प्रभारी म्हणून मनोज ढोरे यांची नेमणूक करीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याकरीता कसोशिने प्रयत्न करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने मनोज ढोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.ढोरे यांची चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हासह प्रभारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
प्रदेश सरचिटणीस धनराज राठोड,प्रदेश प्रसिध्दी प्रमुख शैलेश राऊत,काँग्रेस कमिटी गडचिरोलीसह,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -

