Wednesday, October 28, 2026
Homeदेसाईगंज७५ वर्षीय आजीने दिलेला आशीर्वाद रामदास मसराम यांना लाभदायक ठरेल काय? -...

७५ वर्षीय आजीने दिलेला आशीर्वाद रामदास मसराम यांना लाभदायक ठरेल काय? – मसराम यांनी सत्ता आणि पद नसतांनाही लोकसेवेचा जपला वसा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-विधानसभा निवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे.येत्या २० नोव्हेंबरला मतदान केले जाणार असून हल्ली ‘जोरो- शोरोसे’ प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे.काहींनी धनशक्तीचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.रामदास मसराम यांच्यासह आरमोरी विधानसभा मतदासंघात सात उमेदवार यामध्ये कृष्णा गजबे,आनंदराव गेडाम,शिलू गंटावार,मोहनदास पुराम,चेतन काटेंगे,अनिल केरामी व खेमराज नेवारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे बाजी मारणार कोण? हे अद्याप सांगता येणार नाही.
निवडणुकीपूर्वी आरमोरी विधानसभा क्षेत्रात ज्यांनी ख्यातीच नाही तर सर्वत्र विविध उपक्रम राबवून लोकसेवक म्हणून नाव लौकीक केले व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेतली.अनेकांना आपले केले.कुठलीही सत्ता व पद नसतांना लोकसेवेचा वसा जपला,असे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना जनतेची पसंती मिळणार असल्याचे मत छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांनी व्यक्त केले.
सागर वाढई पुढे म्हणाले की,मला आजही तो एक प्रसंग आठवतो की,एक ७५ वर्षीय आजी मोफत शिबिराचे लाभ प्रसंगी शिबिरा दरम्यान आली.रामदास मसराम यांच्याशी चर्चा करीत असतांना भाऊक होऊन तिला अश्रू अनावर झाले आणि असेच कार्य करीत रहा,भगवंत तुम्हाला मोठे करील,असे म्हणीत आजीने हृदयातून भावना व्यक्त करीत मसराम यांना आशीर्वाद दिला होता.यातूनच मसराम यांची जनतेप्रती असलेली कळकळ लक्षात येते.कित्तेक महिला म्हणाल्या की,आम्हाला लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये नाही मिळाले तरी चालतील; पण मसराम यांना निवडून आणू,पुढील वाटचालीस महिलांनी मसराम यांना शुभेच्छा दिल्या.प्रत्येक भगिनीशी आपुलकीने संवाद साधत त्यांना त्यांचा भाऊ म्हणून प्रत्येक अडचणीत उभा राहण्याचे आश्वासन प्रचार रॅली प्रसंगी रामदास मसराम यांनी दिले.प्रचारात एक आजी म्हणाल्या, रामदास मसराम हे समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालतात.कुठल्याही समाजाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी ते प्रत्येक ठिकाणी हजेरी लावतात. नागरिकांमध्ये मिसळण्याची त्यांची वृत्तीच त्यांना विजयाच्या मार्गावर घेऊन जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!