Wednesday, September 23, 2026
Homeकोरची४५ वर्षीय मिस्त्रीने घराजवळच घेतला गळफास; पत्नीने फोडला हंबरडा..!

४५ वर्षीय मिस्त्रीने घराजवळच घेतला गळफास; पत्नीने फोडला हंबरडा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-नवीन वर्षाचा पहिला दिवस उजळला आणि दुसरा दिवस संपण्याच्या रात्रीच मिस्त्रीचे काम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका ४५ वर्षीय इसमाने घरा लगत असलेल्या वॉल कंपाऊंड नजीकच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, शुक्रवारी ३ जानेवारीला सकाळच्या सुमारास कोरची तालुक्यातील कोच्चीनारा येथे उघडकीस आली.किशोर चैत्राम बघवा वय ४५ वर्षे असे आत्महत्या केलेल्या मिस्त्रिचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नवीन वर्षाच्या २ तारखेला रात्रीच्या सुमारास किशोरने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पत्नीला सकाळच्या सुमारास कळले.सकाळी उठून बघताच पती घरा लगत असलेल्या वॉल कंपाऊंड नजीकच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.पतीला बघतच तिने आरडाओरड करून एकच हंबरडा फोडला.त्यामुळे घराशेजारील तसेच ग्रामस्थ गोळा होत बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.किशोरच्या पश्चात पत्नीसह दोन मुले असून कर्जापायी किशोरने आत्महत्या केल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!