- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच गोळ्या जप्त केल्या.दिलशान काजी सादिक काजी ऊर्फ धीरज मोहन दयाल वय ३० वर्षे, रा.सपना टॉकीजजवळ, जलनगर वॉर्ड,चंद्रपूर असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असतांनाच चंद्रपूर रेल्वे स्टेशनजवळील मुन्ना कॅन्टीनच्या बाजूला,जलनगर वॉर्ड येथे एक इसम जाहीरपणे अवैध शस्त्र बाळगून लोकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदरची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष तात्काळ घटनास्थळावर धाड टाकून संशयित धीरज दयाल ऊर्फ दिलशान काजी याला ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक जुनी वापरती बनावटीची लोखंडी पिस्तूल खोचलेली आढळली,तर पॅन्टच्या खिशात पाच नग जिवंत काडतुसे(बंदुकीच्या गोळ्या) मिळून आली.प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे(एलसीबी पथक) पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे,विनोद भुरले, सुनील गौरकार,सुभाष गोहोकार,सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार,दीपक डोंगरे,इम्रान खान,शरद कुडे, हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

