Wednesday, May 6, 2026
Homeभंडारा२४ वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू.. - दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव..

२४ वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू.. – दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे २४ वर्षीय मेघा आकाश बनारसे  या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने प्रकृती खालावली व त्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेहासह रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर घटनेस जबाबदार असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव काल,सोमवारी मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
निलंबनाचा प्रस्ताव पाठविलेल्यांमध्ये बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चंद्रसुरेश डोंगरवार आणि प्रसूतीतज्ज्ञ रोशनी राऊत यांचा समावेश आहे.या डॉक्टरांवर आता काय कारवाई होणार,याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.महिलेच्या मृत्यूनंतर रविवारी दुपारी तीन वाजेपासून सुरू झालेले आंदोलन तब्बल ७ तासांनंतर विविध अधिकाऱ्यांसमक्ष प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रात्री दहा वाजता मागे घेण्यात आले होते.खासदार, जिल्हा पोलिस अधिक्षक,यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मृतदेह राज्यमार्गावरून उचलून रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले.मेघा आकाश बनारसे या महिलेवर १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सरांडी (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात शस्त्रक्रिया पार पडली.त्याच दिवशी सायंकाळपासून तिला असह्य वेदना सुरू झाल्या.सलग तीन दिवस असह्य वेदना होत असतांना संबंधित डॉक्टर व चमूकडून तिच्या त्रासाचे निदान आणि त्यावर अपेक्षित उपचार न मिळाल्याने अखेर नाइलाजास्तव मरणाला टांगलेल्या मेघाला शस्त्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी भंडारा व त्यानंतर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले.लाखोंचा खर्च करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी नागपूर शासकीय मेडिकल कॉलेज येथे १८ जानेवारीला भरती केले.मात्र,तिथे भरती केल्याच्या दिवशीच रात्री नऊच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.मृत मेघाला साडेतीन व एक वर्ष वयाची दोन मुले आहेत.तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या दोन चिमुकल्यांची आबाळ होऊ नये; यासाठी त्यांच्या पोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी,अशी आमची मागणी असल्याचे आंदोलकांनी सांगितले होते.यापूर्वी २ जानेवारीला बनारसे कुटुंबीयांनी सरांडी (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषण केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकार आणि इस्त्राईल सरकार यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार,भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने...

क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली असून क्षुल्लकशा कारणासाठी बापाने पोटच्या नऊ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बाब आज...

मंत्रिमंडळ निर्णय; अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ,नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार ५ मे रोजी मंत्रीमंडळ बैठक पार पडली.या बैठकीत आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण...

आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ३.१५ लाखांचे अर्थसाहाय्य वस्तू स्वरूपात न देता थेट बचत गटांच्या बँक खात्यात होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवण्याच्या योजनेत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!