Thursday, September 24, 2026
Homeमुंबईमंत्रिमंडळ निर्णय; अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ,नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम..

मंत्रिमंडळ निर्णय; अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ,नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार ५ मे रोजी मंत्रीमंडळ बैठक पार पडली.या बैठकीत आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.डोंगराळ आणि दुर्गम भागातील आदिवासी मुलांचे शिक्षण अधिक गतीमान व्हावे,यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या ५ प्राथमिक आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.यानुसार,प्राथमिक शाळांचे माध्यमिकमध्ये,तर माध्यमिक शाळांचे कनिष्ठ महाविद्यालयात रूपांतर केले जाणार आहे.या निर्णयासाठी आवश्यक पदांची निर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली आहे.याशिवाय,धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे ‘श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय’ आता महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार असून, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने या परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.त्याचबरोबर,सोलापूर आणि परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून(सन २०२६-२७)पदवीस्तराचे तीन नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.यामध्ये
आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय)अँड मशिन लर्निंग’, ‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन’ या तीन नवीन अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!