Monday, August 17, 2026
Homeभंडारा१६ वर्षीय तरुणीवर बिबट्याचा हल्ला; तरुणी गंभीर जखमी

१६ वर्षीय तरुणीवर बिबट्याचा हल्ला; तरुणी गंभीर जखमी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गुराख्यांसह शेळ्या राखत असतांनाच अचानकपणे बिबट्याने हल्ला चढवून एका १६ वर्षीय तरुणीला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी लाखांदूर तालुक्याच्या मांदेड-गवराळा मार्गावरील शिवारात घडली.पूजा मंगेश मेश्राम वय १६ वर्षे, रा.मांदेड,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
पूजा परिसरातील इतर गुराख्यांसह आपल्या शेळ्या चराईसाठी मांदेड गाव नजीकच्या गवराळा मार्गावरील नाल्याजवळ घेऊन गेली होती.शेळ्या चराई करीत
असतांना ती रस्त्यालगत उभी होती.याचवेळेस शिवारातील नाल्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे पूजावर झडप घातली.तिला ठार करणार तितक्यात जवळच परिसरात उपस्थित असलेल्या गुराख्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. जोराने ओरडण्याचा आवाज ऐकून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.दरम्यान,उपस्थितांनी  जखमी पूजाला लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे आरएफओ प्रदीप चन्ने, राऊंड ऑफिसर नागपुरे,गस्ती पथक प्रमुख शिंगाडे, वनरक्षक तुकाराम डावकोरे,चंदन जारवाल तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट दिली.ऐन शेतीच्या हंगामाच्या काळातच सदरची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!