Saturday, September 5, 2026
Homeभंडाराहजारो गावकऱ्यांनी कँडल मार्च काढून मृतांना श्रद्धांजली केली अर्पण.. - ऑर्डनन्स फॅक्टरीतील...

हजारो गावकऱ्यांनी कँडल मार्च काढून मृतांना श्रद्धांजली केली अर्पण.. – ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोट प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडारा जवाहरनगर स्थित आयुध निर्माणी येथील २४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटात कारखान्यातील ८ कर्मचारी ठार झाले तर,५ जण गंभीर जखमी झाले होते.त्यामुळे आज,बुधवारी २९ जानेवारीला सलग तिसऱ्या दिवशीही कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू होते.दरम्यान,आज निर्माणी परिसरातील हजारो गावकऱ्यांनी कँडल मार्च काढून लुंबिनी पार्क येथे मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.जवाहरनगर आयुध निर्माणीतील विविध विभागातील बिल्डिंग,मशिनरी व अन्य सामुग्री ही जुन्या काळातील आहे.यात नव्याने बदल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. धोकादायक विभागात काम करतांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधात कुठलीही उपाययोजना निर्माणी प्रशासनाद्वारे केली गेली नाही.या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे २४ जानेवारीला अचानक स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर,पाच कामगार गंभीर जखमी झाले.अशा घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही,तोपर्यंत निर्माणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून आज सायंकाळी निर्माणी कर्मचाऱ्यांनी निर्माणीतील मुख्य द्वार ते जवाहरनगर वसाहत परिसरातील लुंबिनी पार्कपर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.यात लुंबिनी पार्कमध्ये शोकसभा घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या मानवंदना व श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी आयुध निर्माणी वसाहतीतील कामगारांच्या कुटुंबीयांसह परिसरातील सावरी,सावली,कोंढा,ठाणा आदी गावांतील हजारो महिला पुरुषांचा समावेश आहे.आयुध निर्माणीत २४ जानेवारीच्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!