- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही.ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,यासाठी आज,मंगळवार १८ मार्च रोजी देसाईगंज येथे अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने भव्य जन आक्रोश शांती मार्च काढण्यात आला.या आंदोलनांतर्गत देसाईगंज तालुक्यातील हजारो बौद्ध बांधव उपविभागीय कार्यालयावर धडकले.भव्य जन आक्रोश शांती मार्च सर्वप्रथम शहरातील दीक्षाभूमी या ठिकाणाहून मुख्य मार्ग,फवारा चौक ते उपविभागीय कार्यालय या ठिकाणी धडक देत उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले व बौद्ध बांधवांसह अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने
उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला आहे.इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले.शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली,तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई १९९२ पासून आंदोलन करीत आहेत.सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वत्र संघटना आक्रमक झाल्या आहेत.
प्रमुख मागण्या👇
बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा,बुद्धगया मंदिर व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करावी,महाबोधि विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूंऐवजी बौद्ध समाजाच्या हाती सोपवावे,यासाठी आंदोलन केली जात आहेत.यासंदर्भात देसाईगंज उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार विलास तुपट यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना बौद्ध बांधव तथा अखिल भारतीय भिख्खू संघाचे भंते यांच्या वतीने मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
भव्य जन आक्रोश आंदोलनाचे व्हिडिओ👇
- Advertisement -