उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी समिती ९ मे २०२३ रोजी गठित करण्यात आली.चौकशी समिती गठित तर करण्यात आली; मात्र ज्या विभागाची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती.त्याच तक्रार विभागाचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपल्याच कार्यालयातील अधिनस्त असणारे कर्मचारी वर्ग समितीमध्ये नियुक्त करून स्वतःच स्वयंम घोषित अध्यक्ष बनले असल्याने सदर गठित करण्यात आलेली समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.त्यामुळे देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागातर्फे तक्रारकर्ते तथा उपोषणकर्ते यांची दिशाभूल केली जात असल्याने तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी; अशी मागणी सत्यवान रामटेके यांनी केली आहे.
रामटेके यांनी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत झालेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तसेच कारवाई केली जात नसल्याने आमरण उपोषण सुरू केला होता.त्यानुसार आमरण उपोषणाच्याच दिवशी लिखित स्वरूपात ९ मे २०२३ रोजी चौकशी समिती गठित करण्याचे पत्र देण्यात आले.त्यानुसार ९ मे २०२३ रोजी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.चौकशी समिती गठित करून सर्वांचे पितळ उघडे पाडण्यात येणार होते.मात्र हल्ली गठित करण्यात आलेली चौकशी समितीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याने नेमकी चौकशी करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण की,सदर समितीमध्ये देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गतच येणारे देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यातीलच कर्मचारी व पदाधिकारी नेमण्यात आले आहेत.अशातच ज्या विभागाची तक्रार त्याच विभागाचे कर्मचारी असल्याने यात सावळा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ,आरमोरी तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या साईट देसाईगंजचे कर्मचारी चौकशी करणार तर आरमोरीचे कर्मचारी मीही तुझा भांडाफोड करणार वा ‘तेरी भी चूप तो मेरी भी चूप’ असे झाल्याशिवाय राहणार नसल्याने नेमकी चौकशी कशी काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातो आहे .
महत्वाचे म्हणजे ज्या विभागाची तक्रार आहे; त्याच विभागास तक्रार करणे उचित नसल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास तक्रार दाखल करण्यात आली.त्यानुसार चौकशी समिती गठित करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडूनच व्हायला हवे होते.मात्र तसे न करता देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच मन मर्जीने आपल्याच कार्यालयातील कर्मचारी वर्गांना सचिव,सदस्य व स्वतः स्वयंम घोषित समितीचे अध्यक्ष बनवून टाकले आहे.नवलाची बाब म्हणजे गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकाऱ्यांनी देसाईगंज वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना तुमच्याच कार्यालयाची तक्रार असल्याने तुम्हीच आपल्या कार्यालयाचे अध्यक्ष बना..! व आपल्याच कार्यालयातील कर्मचारी वर्ग चौकशी समिती गठित करतांना नेमा?असे म्हटले वा तसा आदेश पत्रानिशी देण्यात आला काय?असाही प्रश्न निर्माण झाला आहे.दिले असल्यास सदर समितीचे तुम्हीच अध्यक्ष बना..!असे लिखित पत्र आहे काय? सदर संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने जाणून बुजून उपोषण कर्त्याची दिशाभूल करून; पळवाटा शोधून; कुणाला तरी वाचविण्याच्या प्रयत्नात बचाव कार्य सुरू असल्याने देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे;अशी मागणी सत्यवान रामटेके यांनी केली आहे.
…..पुढील वृत्त उद्याला…..