- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.१५ ऑक्टोंबर पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, जुगार प्रतिबंध,प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू तसेच इतर अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता पोलीस स्टेशन रामनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने काल,शनिवारी २६ ऑक्टोंबर रोजी गस्त सुरू असताना शहरात एक महिला वेश्याव्यवसाय चालवित असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.त्यानुसार
स्त्रीया व मूली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,पोउपनि संतोष निभोरकर,महिला व पुरुष अंमलदार,समाजसेविका श्रीमती सरिता राजेद्र मालु यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून छापा टाकला.त्यात तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख,रा.जुनोना चौक, चंद्रपूर या दलाल महिलेवर कारवाई करण्यात आली व रामनगर पोलीस स्टेशन येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच चार पिडीत महिलांची सुटका करून त्यांना स्वाधारगृहात दाखल करण्यात आले.
- Advertisement -