उद्रेक न्युज वृत्त :- सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आज,गुरुवार २७ मार्चला चकमक उडाली.यात दोन दहशतवादी ठार तर तीन जवान शहीद झाले.आज गुरुवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती.जुठाणा परिसरात ४ ते ५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली, त्यादरम्यान गोळीबार सुरू झाला.सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईत डीएसपी धीरज सिंगसह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती.रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सर्वांना जम्मू मेडिकल कॉलेज (जेएमसी) येथे हलविण्यात आले आहे.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार तर तीन जवान शहीद..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

