उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक -९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.त्यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच पहिली सही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा १७ वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवढ्यात प्राप्त होणार आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवते.त्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अशीच एक योजना आहे.या योजनेंतर्गत आतापर्यंत १६ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.त्यात १७ वा हप्ता देखील लवकरच मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

