Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीसहा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. - साखरा शाळेसमोर स्पीड ब्रेकर बसविण्याची...

सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. – साखरा शाळेसमोर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ सी वरील साखरा गावाजवळील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ स्पीड ब्रेकर,चेतावणी फलक आणि झेब्रा क्रॉसिंग बसविण्यात यावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोरकुटे यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग,नवी दिल्ली यांच्याकडे केली आहे.
शाळा महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असून दररोज शेकडो विद्यार्थी हा वेगवान वाहतूक असलेला महामार्ग ओलांडतात.वाहनांचा वेग इतका जास्त असतो की,एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. “ही परिस्थिती म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेवरील थेट आघात असून,हा त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग आहे,” असे बोरकुटे यांनी म्हटले आहे.२०१९ साली तत्कालीन उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी(बोरकुटे)यांनी हा मुद्दा राष्ट्रीय तसेच राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या संयुक्त जनसुनावणीत मांडला होता. त्यानंतर ग्रामपंचायत साखरा यांनी विशेष ग्रामसभेत ठराव पारित करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला.मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून विकास कशाला? लवकरात लवकर उपाययोजना व्हायलाच हव्यात,” असा सवाल बोरकुटे यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी तातडीने स्पीड ब्रेकर,चेतावणी फलक व झेब्रा क्रॉसिंग बसविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा,अशी मागणी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!