- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-रंगपंचमीनिमित्त नागपूरहून सहलीचा आनंद लुटण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील रावणवाडी जलाशयात गेलेल्या तरुणांची बोट उलटून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.तब्बल चोवीस तासांच्या शोधमोहिमेनंतर आज,बुधवार ४ मार्च रोजी तरुणाचा मृतदेह जलाशयात सापडला.सौरभ मेहरा वय ३० वर्षे, रा.धरमपेठ,नागपूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
नागपूरहून काही तरुणांचा गट काल मंगळवारी सहलीसाठी रावणवाडी जलाशयावर गेला होता.विशेष म्हणजे,होळी आणि रंगपंचमीनिमित्त जलाशय पर्यटकांसाठी बंद असतांनाही,आदेशांचे उल्लंघन करून हे पर्यटक जलाशयात उतरले होते.जलाशयात बोटिंग करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बोट अनियंत्रित झाल्याने ती अचानक उलटली.सौरभला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला,तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी पोहत-पोहत
किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशनचे एपीआय धनंजय पाटील पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक मच्छीमार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधमोहिम राबविण्यात आली.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज सकाळी शोधमोहीम सुरू केली असता सौरभचा मृतदेह सापडला.घटनेने मेहरा कुटूंबीय शोकसागरात बुडाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

