Saturday, September 12, 2026
Homeभंडारासमोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू...

समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी गावानजिक रामनगरजवळ सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.कैलाश मरकाम वय ४२ वर्षे,पारबता मरकाम वय ३६ वर्षे,व दुर्गा कंगाली वय ३० वर्षे तर ५ वर्षीय चिमुकली यामिनी कंगाली अशी मृतकांची नावे आहेत.
माहितीनुसार,चौघेही लग्न समारंभाकरिता दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे गेले होते.लग्न आटोपून रात्रीच्या सुमारास दुचाकीने त्यांचे स्वगाव चिखला (माईन) येथे परत येत होते.अशातच कैलाश मरकाम त्याची पत्नी पारबता कैलाश मरकाम,शेजारी राहणाऱ्या सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षाची मुलगी यामीनी दुर्गाप्रसाद कंगाली हे चौघे परत येत असतांना वरातीचे बोलेरो वाहन चालकाने पूर्वीच नाकाडोंगरी जवळील चांदमारा लोभीजवळ एका इसमास धडक दिली होती.त्यामुळे बोलेरो वाहन चालक दिनेश गौपाले मध्यप्रदेशकडे सुसाट वेगाने जात होता.अशातच दुचाकीवर असलेल्या चौघांना जबर धडक दिल्याने चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!