Friday, September 25, 2026
Homeचंद्रपूरशेळ्या चारण्यासाठी गेलेला व्यक्ती पुन्हा वाघाच्या हल्ल्यात ठार...

शेळ्या चारण्यासाठी गेलेला व्यक्ती पुन्हा वाघाच्या हल्ल्यात ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चिचपल्ली वनविभागाच्या मूल येथील कक्ष क्रमांक-७५२ मध्ये रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच परत पुन्हा काल,मंगळवारी दिनांक-२० ऑगस्टला सावली वनपरीक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सिर्सी बिटातील कक्ष क्र.१९६ राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.दिवाकर नत्थू आवळे वय ५० वर्षे रा. सिर्सी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे गुराखी हा शेळ्या चराईसाठी जंगलात गेला होता.दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला.साथीदाराने आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता गुराखी मृतावस्थेत आढळून आला.गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे,क्षेत्र सहाय्यक कोडापे,पोलिस विभागातील पीएसआय मुसळे व विजय कोटनाके  आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता सावलीचे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतकाच्या कुटुंबाला वनविभागाकडून २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली.
दिवसेंदिवस चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.या घटनांमुळे गुरेचराई करणाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!