उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- यंदाच्या परिस्थितीत शेतकरी बांधव शेतातील धान पिकांच्या बाबतीत मोठ्या आशेवर होते.धान पीक पाहून अमुक व्यक्तीला एवढे धान होणार; तमुक व्यक्तीला तेवढे धान होणार; मात्र कृत्रिमरीत्या आलेल्या पुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरले आहे.कारण की साहेब वा मॅडम येतो व वर-वर पाहून निघून जातो.त्यांना ‘ना सुतक ना बारसा ‘असे असल्याने कोंढाळा गावातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर २०२३ रोजी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली होती. अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटरवर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले होते.
कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक जरी नष्ट झाले नसले तरी गर्भाशयात आलेल्या धान पिकावर पुराच्या पाण्याचा मारा झाल्याने येणारे धानाचे लोंब काळपट व पांढरे येणार असल्याचे गावातील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.त्यानुसार येणाऱ्या धानाला कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतीचे पंचनामे होणार की नाही? तसेच नुकसान भरपाई मिळणार की नाही? अशी चिंता गावातील शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. अशातच ‘शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी’ व साहेब म्हणतो आम्ही आता गाणार गाणी’ असे होऊन चालणार नाही तर नुकसाभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधवांकडून जोर धरू लागली आहे.
.