Tuesday, March 18, 2025
Homeदेसाईगंजशिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती- माझी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे...
spot_img

शिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती- माझी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज  :-हिंदवी स्वराज्याची निर्मीती करतांना छञपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातिल लोकांना सोबत घेवुन रयतेच्या हिताचे रक्षण केले.शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती.असे प्रतिपादन माजी कैबिनेट मंञी तथा ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेञाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.          देसाईगंज तालुक्यातिल कुरुड येथे काल १८ फेब्रुवारी ला नवतरुण युवक मंडळाच्या वतिने बळीराजा चौकातिल सुभाष वार्डात शिव जयंती महोत्सव निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शिवचरिञ प्रबोधनकार कांचनताई शेळके यांच्या शिवकिर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त करतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की,देशात मोघलांनी सत्ता काबिज केल्यानंतर जुलमी राजसत्ता अस्तित्वात आली.या सत्तेत सर्वसामान्य जनतेवर अनेक कर आखुन मोघलांनी लुट मचवली होती. मोघलांवेतिरिक्त इतर धर्मियांना अपमानजनक वागणुक दिली जात होती.आपल्या मातित इतरांनी राज्य करणे हे जिजाऊंना मान्य न्हवते.यासाठी स्वराज्याचा पाया रचण्यासाठी जिजाऊंनी लहानवयातच शिवरायांवर स्वराज्य निर्मितिचे संस्कार रुजविले; स्वराज्याचा लढा उभारतांना शिवरायांनी जातिभेद व धर्मभेद ही संकल्पना स्पष्टपणे नाकारली. आपल्या सैन्यात सर्व जातिधर्मातिल मावळ्यांसह मुस्लिमांनाही मानाचे स्थान देवुन छञपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष पद्धतिने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी दांभिक सत्तेचे मनसुबे हानुण पाडा;असे आवाहनही कार्यक्रमाप्रसंगी वडेट्टीवारांनी केले.

कार्यक्रमाला माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,डॉ.नामदेव किरसान वामनराव सावसाकडे, परसराम टिकले,राजुभाऊ रासेकर,नितिन राऊत, मनोज ढोरे,नानाजी तुपट,हरिष मोटवानी,राजु बुल्ले, दिगांबर मेश्राम,प्रशाला गेडाम,संदिप वाघाडे,अरुण कुंभलवार,यांचेसह मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन मनोज ढोरे यांचा वडेट्टीवार यांचे हस्ते शाल व श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या  सामान्य ज्ञान परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्ध्यार्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदिप उरकुडे, गणेश भोयर,संदिप प्रधान,पियुष उरकुडे,अनिल चिंचोळकर,आदित्य मिसार यांचेसह नवतरुण युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांकरिता एमपीएससी पूर्व प्रशिक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)पूर्व प्रशिक्षण तसेच जिल्हा...

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!